Virender Sehwag : आपल्या देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ ठेवण्याची अटकळ सुरू आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी मागणी केली आहे. वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियाच्या जर्सीवर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ लिहावे, अशी मागणी त्याने केली आहे. वीरेंद्र सेहवागने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर ही मागणी केली आहे. या पोस्टमध्ये त्याने बीसीसीआय आणि त्याचे सचिव जय शाह यांनाही टॅग केले आहे.
सेहवागने लिहिले की, ”माझा नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की त्यामुळे आपल्यामध्ये अभिमान निर्माण होईल. आम्ही भारतीय आहोत. इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले होते आणि आपले मूळ नाव ‘भारत’ परत मिळण्यास बराच काळ लागला आहे.”
हेही वाचा – आपल्या देशाला ‘भारत’, ‘India’ ही नावे कशी पडली?
त्याने पुढे आवाहन केले आणि लिहिले की विश्वचषकातील खेळाडूंच्या जर्सीवर भारत असे लिहिले पाहिजे. बीसीसीआयची पोस्ट रिपोस्ट करताना सेहवागने लिहिले की, ‘या विश्वचषकात जेव्हा आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डूचा जयजयकार करतो तेव्हा आपल्या हृदयात भारत असावा आणि ज्या जर्सीवर ‘भारत’ लिहिलेले असेल ती जर्सी खेळाडूंनी घालावी.’
सेहवागने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 1996 चा विश्वचषक खेळण्यासाठी नेदरलँड्सची टीम भारतात आली तेव्हा त्यांचे नाव हॉलंड होते. पण आपण 2003 मध्ये भेटलो तेव्हा ते नेदरलँड्स नावाने खेळत होते. ब्रिटीशांनी म्यानमारला दिलेले नावही बर्माने बदलले आहे. इतर अनेक देश त्यांच्या मूळ नावावर परतत आहेत.
विश्वचषक कधी आहे?
एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.
हेही वाचा – World Cup 2023 : मोठी बातमी! वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा संघ
विश्वचषक 2023 साठी, यावेळी 45 दिवसांत 48 सामने खेळवले जातील. यासाठी 10 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळणार आहे.पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईत आणि दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबरला होईल, तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!