वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. विराट कोहलीच्या 50व्या वनडे शतकाने हा सामना अधिक गोड झाला. विराटच्या शतकामुळे अनेक विक्रम मोडित निघाले. अनेकांना अशक्य वाटणारा सचिन तेंडुलकरचा हा विक्रम विराटने त्याच्यापेक्षा अर्ध्या सामन्यात खेळून पाठी टाकला. अनेकांना विराटच्या लाइफस्टाइलमध्ये रस असतो. तो काय खातो, कसा राहतो, फिटनेस कसा सांभाळतो याचे कुतुहूल असते. त्यामुळे विराटच्या प्रत्येक हालचालीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. संपूर्ण स्पर्धेत विराट वापरत असलेली एक वस्तू लोकांना दिसत होती, पण ती नेमकी काय आहे, ते कळत नव्हते. सचिनचा विक्रम मोडताना विराटने मनगटावर एक बँड (Virat Kohli Fitness Band) घातला होता. हा बँड इतर स्मार्टबँड किंवा घड्याळासारखा नॉर्मल नक्कीच नाही.
घड्याळासारखा दिसणारी ही वस्तू एक फिटनेस बँड आहे. पण हा फिटनेस बँड इतर बँड किंवा ट्रॅकरपेक्षा खूप वेगळा आहे. हा फिटनेस बँड Whoop ब्रँडचा आहे, जो सध्या भारतात लाँच झालेला नाही.
हेही वाचा – पेट्रोल पंपावर फक्त झिरो बघू नका, ‘या’ गोष्टींकडेही नजर ठेवा!
बाजारात अनेक प्रकारची स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस बँड्स उपलब्ध आहेत, पण हा एक वेगळा प्रकार आहे. कारण या बँडला डिस्प्ले नाही आणि तो वेगळ्या पद्धतीने चार्जही होतो.
हा बँड इतर भारतीय क्रिकेटपटूंच्या मनगटावरही दिसतो. अॅपल वॉच आणि इतर स्मार्ट वॉचेसच्या मागे जग धावत असताना भारतीय क्रिकेटर्सनी हा फिटनेस बँड का घातला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Whoop बद्दल…
Whoop हा ब्रँड 2015 मध्ये सुरू झाला होता. विल अहमद हे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत. कंपनीने 2015 मध्ये आपले पहिले डिव्हाईस WHOOP 1.0 लाँच केले. 2021 मध्ये कंपनीने त्याचे 4.0 व्हर्जन लाँच केले. अलीकडेच कंपनीने OpenAI सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत कंपनीने Whoop Coach लाँच केले आहे.
इतर फिटनेस ट्रॅकर्सद्वारे मोजलेला डेटा सामान्यतः पूर्णत: बरोबर नसतो. Whoop च्या म्हणण्यानुसार, या बँडद्वारे ट्रॅक केलेला हेल्थ आणि फिटनेस डेटा 99% पर्यंत अचूक आहे.
हा बँड केवळ ट्रॅकच करत नाही तर रिअल टाइम स्ट्रेस स्कोअरही देतो. हा एक रिकव्हरी फोकस्ड ट्रॅकर आहे, जो खेळाडूंना त्यांचे शरीर खेळण्यासाठी किती तयार आहे आणि कोणत्या प्रकारची सुधारणा आवश्यक आहे हे देखील सांगतो.
उदाहरणार्थ, यात स्लीप कोच फीचर आहे जे तुम्हाला सांगते की तुमचे शरीर किती आणि किती झोपू शकते. इतर ट्रॅकर्समध्ये, तुम्ही किती तास झोपले पाहिजे आणि तुम्ही किती तास झोपले आहात याची माहिती मिळते. पण विराटच्या या बँडमध्ये आज तुम्ही किती तास झोपले तर तुमचे शरीर 100% परफॉर्म करू शकते, याची माहिती मिळते.
बँडची किंमत
हा फिटनेस बँड सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. या बँडसाठी तुम्हाला मासिक सबस्क्रिप्शन शुल्क भरावे लागेल. Whoop 4.0 च्या मदतीने तुम्ही हार्ड रेट व्हॅरिबिलिटी, टेम्परेचर, रेस्पिरेशन रेट, ब्लड ऑक्सिजन लेवल, कॅलरी एक्सपेंडेड आणि इतर अनेक गोष्टींचा मागोवा घेऊ शकता. हा फिटनेस बँड एका सेकंदात 100 वेळा हा डेटा गोळा करतो. 12-महिन्याच्या सबस्क्रिप्शनसह, तुम्ही हा फिटनेस बँड $239 मध्ये खरेदी करू शकता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!