World Cup 2023 : मोठी बातमी! वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा संघ

WhatsApp Group

World Cup 2023 Team India Squad : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. या विश्वचषकासाठी अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी विश्वचषक 2023 हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.

युझवेंद्र चहलला या संघात संधी मिळालेली नाही, तर आशिया चषक स्पर्धेत ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून समाविष्ट झालेला संजू सॅमसनही या यादीतून बाहेर आहे. तिलक वर्मालाही वगळण्यात आले आहे. तर केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषक 2023 साठी भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

हेही वाचा – कोविड लसीमुळे भारतीय लोकांना येतोय हृदयविकाराचा झटका? जाणून घ्या वास्तव!

भारत-पाकिस्तान सामना

भारत एकट्याने वनडे विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी विश्वचषक 2023 हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला महासामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

संघात अजूनही होऊ शकतात बदल

भारतासह इतर 10 देशांच्या संघात अजूनही बदलांना वाव आहे. जर एखाद्या देशाला त्यांच्या घोषित संघात बदल करायचे असतील तर ते 28 सप्टेंबरपर्यंत आयसीसीच्या परवानगीशिवाय बदल करू शकतात. मात्र 28 सप्टेंबरपर्यंत अंतिम 15 सदस्यीय संघ जाहीर करावा लागणार आहे. यानंतर आयसीसीच्या मंजुरीनंतरच बदल करता येतील.

भारताचे सामने…

  • 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
  • 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान दिल्ली
  • 14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
  • 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
  • 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
  • 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
  • 2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
  • 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • 12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बंगळुरू
  • 15 नोव्हेंबर – पहिली उपांत्य फेरी – मुंबई
  • 16 नोव्हेंबर – दुसरी उपांत्य फेरी – कोलकाता
  • 19 नोव्हेंबर – अंतिम सामना – अहमदाबाद

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment