वर्ल्डकपदरम्यान धक्कादायक बातमी, क्रीडामंत्र्याने उचलले कडक पाऊल!

WhatsApp Group

World Cup 2023 : विश्वचषकादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका संघाचे संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. क्रीडामंत्र्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकताच भारताकडून श्रीलंका संघाला दारुण पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर ही शिक्षा क्रिकेट मंडळाच्या सर्व सदस्यांना करण्यात आली आहे.

विश्वचषक 2023 मध्ये सातत्याने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला बरखास्त केले आहे. विश्वचषकात भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काही दिवसांनी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. श्रीलंका क्रिकेटचे सचिव आणि बोर्डाचे दुसरे सर्वोच्च अधिकारी मोहन डी सिल्वा यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने संपूर्ण बोर्ड हटवले आहे.

हेही वाचा – साताऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड

क्रिकेट बोर्ड बरखास्त केल्यानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी अंतरिम समिती स्थापन केली आहे. श्रीलंकेचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. रणतुंगा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांचाही बोर्डाच्या सात सदस्यीय समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकादरम्यान देशाच्या क्रीडा मंत्रालयाचे हे मोठे पाऊल आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची अत्यंत लाजिरवाणी कामगिरी झाली आहे.

श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 357 धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात श्रीलंकेचे फलंदाज कोलमडले. अत्यंत लज्जास्पद फलंदाजी करताना संघाचे 11 फलंदाज अवघ्या 55 धावांत सर्वबाद झाले. विश्वचषकापूर्वी भारताने आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर 50 धावांत ऑलआऊट करून विजेतेपद पटकावले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment