Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये रोहित जबरदस्त ओपनिंग करतोय शिवाय त्याने कॅप्टन्सीमध्येही आपली झलक दाखवलीय. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात रोहितने झटपट अर्धशतक झळकावले. त्यामुळे पहिल्या 10 षटकांत भारताने 90 पेक्षा जास्त धावा जोडल्या. या वर्ल्डकपमध्ये रोहित ज्या पद्धतीने गोलंदाजांना ठोकतोय, ते पाहून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने सध्या रोहित शर्मासारखा विध्वंसक फलंदाज दुसरा कुठेच नाही, अशा शब्दांत कौतुक केले आहे.
रोहित शर्माने नेदरलँडविरुद्ध 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्याने शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. सध्याच्या विश्वचषकात रोहितने 9 सामन्यात 503 धावा केल्या आहेत ज्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. वसीम अक्रम, शोएब मलिक, मोईन खान आणि मिसबाह उल हक एका पाकिस्तानी चॅनेलवर वर्ल्डकपबाबत भाष्य करतात. अक्रम म्हणाला, ”मला वाटत नाही की रोहितसारखा दुसरा खेळाडू सध्या जगात आहे. आपण विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन आणि बाबर आझमबद्दल बोलतो, पण हा पोरगा वेगळा आहे. त्यामुळे फलंदाजी सोपी होते. मग ते कोणतेही गोलंदाजी आक्रमण असो किंवा कोणतीही परिस्थिती, रोहित अतिशय सहजतेने फटके मारतो.”
हेही वाचा – VIDEO : ‘हा’ आहे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात भारी कॅच!
”रोहित पाचही गोलंदाजांना तुडवतो”
भारताने नेदरलँड्सविरुद्ध 4 गडी गमावत 410 धावा केल्या, ही वर्ल्डकपमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील सर्वात मोठा स्कोअर 413 धावा आहे, जो त्यांनी बर्म्युडाविरुद्ध केला होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनेही रोहितचे खूप कौतुक केले. मलिक म्हणाला, ”रोहित असा फलंदाज आहे की विरोधी संघात 5 गोलंदाज असतील तर तो पाचही गोलंदाजांना तुडवतो.”
रोहितने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 9 गोलंदाज आजमावले. त्याने स्वतः गोलंदाजीही केली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसह शुबमन गिलनेही गोलंदाजीत हात आजमावला. रोहित आणि विराटने गोलंदाजीतही प्रत्येकी एक विकेट घेतली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!