बावुमाच्या स्वप्नांची राखरांगोळी, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये, आता गाठ भारताशी!

WhatsApp Group

पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पॅट कमिन्सच्या संघाने वर्ल्डकप 2023च्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 3 विकेट्सने पराभूत केले. टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेचा अनफिट कप्तान टेंबा बावुमाने कोलकात्यात प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बावुमा (0) पुन्हा फ्लॉप झालाच सोबत फॉर्मात असलेले रासी व्हॅन डर डुसेन (6), एडन मार्कराम (10) यांनीही कच खाल्ली. एकट्या डेव्हिड मिलरचे शतक आणि क्लासेनची खेळी दक्षिण आफ्रिकेला 212 धावांपर्यंत घेऊन गेली.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 60 रन्सची पार्टनरशिप जोडली. त्यानंतर आफ्रिकने स्पिनला प्रोत्साहन देत केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांना आणले. कमी टार्गेट असल्याने दोघांनीही विकेट्स काढत, निर्धाव चेंडू टाकत ऑस्ट्रेलियाला दबावात टाकण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथ (30), मार्नस लाबुशेन (18), जोल इंग्लिस (28) यांनी थोड-थोडकी बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाला जिंकवले. आफ्रिकेकडून गेराल्ज कोएट्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. रबाडा, मार्कराम आणि महाराज यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

हेही वाचा – पेट्रोल पंपावर फक्त झिरो बघू नका, ‘या’ गोष्टींकडेही नजर ठेवा!

डेव्हिड मिलरने सेमीफायनलमध्ये शतक झळकावून इतिहास रचला. मिलर हा वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मिलर फलंदाजीला आला, तेव्हा आफ्रिकेचा संघ 24 धावांत 4 विकेट गमावून संघर्ष करत होता. मिलरने 8 चौकार आणि 5 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. मिलरशिवाय क्लासेनने 47 धावा केल्या.
दोन्ही फलंदाजांमध्ये 18 षटकांत 95 धावांची भागीदारी झाली. ट्रॅव्हिस हेडने दोन चेंडूंत दोन विकेट घेत ही भागीदारी मोडली. 48व्या षटकात मिलर बाद झाल्यामुळे 230 पर्यंत पोहोचू शकणारी आफ्रिका 212 धावांवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 3, हेझलवूड आणि हेडने प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment