Quinton de Kock Century vs Australia In Marathi : विश्वचषक 2023 चा 10 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (World Cup 2023 SA vs AUS) यांच्यात लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने शतक साकारले आहे. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातही डी कॉकने शतक ठोकले होते. यंदाच्या वर्ल्डकपमधून डी कॉक वनडे क्रिकेटला अलविदा करणार आहे.
क्विंटन डी कॉकचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 19 वे शतक आहे. 94 धावांवर असताना डी कॉकने ऑस्ट्रेलियाचा कप्तान पॅट कमिन्सला षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलने टाकलेल्या 35व्या षटकात डी कॉक आऊट झाला. त्याने 8 चौकार आणि 5 षटकारांसह 109 धावांची खेळी केली. त्याने कप्तान टेम्बा बावुमासह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही रचली.
हेही वाचा – IND Vs PAK : मुंबईतून अहमदाबादला मॅच पाहायला जाणाऱ्यांसाठी स्पेशल ट्रेन! जाणून घ्या डिटेल्स
दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक वनडे शतक
- 27 – हाशिम आमला
- 19 – क्विंटन डी कॉक*
- 18 – हर्शेल गिब्स
- 13 – गॅरी कर्स्टन
- 10 – ग्रॅम स्मिथ
वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके
- 4 – एबी डिव्हिलियर्स
- 2 – हाशिम आमला
- 2 – फाफ डु प्लेसिस
- 2 – हर्शेल गिब्स
- 2 – क्विंटन डी कॉक
दोन्ही संघांची Playing 11
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!