

World Cup 2023 PAK vs SL Sri Lanka Record In Marathi : कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेला विक्रम मोडीत काढला. वर्ल्डकप 2023 च्या 8 व्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानविरुद्ध 9 गडी गमावत 344 धावा केल्या. श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर पाकिस्तानचे गोलंदाज हतबल दिसत होते. पहिली विकेट लवकर पडल्यानंतरही, श्रीलंकेने वेगवान धावसंख्या सुरू ठेवली आणि हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानसाठी मोठे लक्ष्य ठेवले.
विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. टीम इंडियाने 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सवर 336 धावा केल्या होत्या. पण आता श्रीलंकेने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे ज्याने 2019 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 334 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध समान 310 धावा केल्या आहेत.
कुसल मेंडिसचे वेगवान शतक (World Cup 2023 PAK vs SL)
कुसल मेंडिस विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 77 चेंडूत 122 धावांची खेळी केली. त्याने 65 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यावेळी मेंडिसने अनुभवी यष्टीरक्षक कुमार संगकाराचा विक्रम मोडला, ज्याने 2015 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 70 चेंडूत शतक झळकावले होते. संगकाराने याच विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध 73 चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा – 23 वर्षाच्या पाकिस्तानी खेळाडूचा वर्ल्डकपमध्ये धमाका, ठोकले जबरदस्त शतक!
विश्वचषकाच्या इतिहासातील सहावे जलद शतक (PAK vs SL)
कुसल मेंडिस हा वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा सहावा फलंदाज आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आहे, ज्याने 2023 मध्ये दिल्लीत झालेल्या याच विश्वचषकात 49 चेंडूत शतक झळकावले होते. आयर्लंडच्या केविन ओब्रायनने 50 चेंडूत शतक, तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने 51 चेंडूत शतक, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सने 52 चेंडूत शतक तर इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने 57 चेंडूत शतक झळकावले.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!