World Cup 2023 : न्यूझीलंडकडून बांगलादेशचाही फडशा, विल्यमसनचे डॅशिंग कमबॅक!

WhatsApp Group

World Cup 2023 NZ vs BAN In Marathi : वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाने आपली कामगिरी सुसाट ठेवली आहे. न्यूझीलंड संघ सलग तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेची एका स्थानाने घसरण झाली आहे. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा (NZ vs BAN) 8 गडी राखून पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. किवी संघाकडून कर्णधार केन विल्यमसनने शानदार पुनरागमन केले. दुखापतीमुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नाही. दुसरीकडे, बांगलादेशचा 3 सामन्यातील हा दुसरा पराभव आहे.

बांगलादेशने दिलेल्या 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने 42.2 षटकात 2 बाद 248 धावा केल्या. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि एकूण धावसंख्येत 12 धावांची भर पडली तेव्हा मुस्तफिजुर रहमानने रचिन रवींद्रला मुशफिकर रहीमकडे झेलबाद करून किवी संघाला मोठा धक्का दिला. यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि कर्णधार विल्यमसन यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. कॉनवे 45 धावा करून बाद झाला. डॅरिल मिशेलने 68 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या तर ग्लेन फिलिप्स 11 चेंडूत 16 धावा करून नाबाद परतला. मिशेलने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

हेही वाचा – VIDEO : अचानक हृतिक रोशन मेट्रोत दिसला, प्रवाशांनी ओळखलं आणि…

विल्यमसनची 78 धावांची खेळी (World Cup 2023 NZ vs BAN)

कॉनवे बाद झाल्यानंतर विल्यमसनला डॅरिल मिशेलची साथ मिळाली. मात्र, 107 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78 धावा करून विल्यमसन दुखापतग्रस्त झाला. बांगलादेशी क्षेत्ररक्षकाच्या थ्रोमुळे तो जखमी झाला. विल्यमसनला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला.

तत्पूर्वी, बांगलादेश संघाने 9 बाद 245 धावा केल्या. बांगलादेशकडून यष्टिरक्षक मुशफिकुर रहीमने 75 चेंडूत 66 धावा केल्या तर महमुदुल्लाह 41 धावा करून नाबाद परतला. कर्णधार शाकिब अल हसन 40 धावा करून बाद झाला. मेहदी हसन मिराजने 30 धावांचे योगदान दिले. किवी संघाकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 तर ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. फिरकीपटू सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment