IND vs PAK World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स जवळपास बुक झाली आहेत आणि त्यांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. आता चाहत्यांनी देसी जुगाड शोधून काढलाा आहे. हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणाऱ्या चाहत्यांनी हॉटेलऐवजी हॉस्पिटलचे बुकिंग सुरू केले आहे. विश्वचषक स्पर्धेचे सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. 46 दिवस चालणाऱ्या आयसीसी स्पर्धेत 10 संघ सहभागी होत असून एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.
अहमदाबाद मिररच्या बातमीनुसार, अहमदाबादमध्ये हॉटेलचे एका दिवसाचे भाडे जवळपास 50 हजारांवर पोहोचले आहे. त्याच वेळी, रुग्णालयात एक-दोन मुक्कामासाठी त्यांना 3 हजार ते 25 हजार इतकाच खर्च करावा लागणार आहे, जे हॉटेलच्या भाड्यापेक्षा सुमारे 25 हजार रुपयांनी कमी आहे. एका खासगी रुग्णालयाचे संचालक डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात ते संपूर्ण शरीर तपासणी आणि रात्रीचा मुक्काम करण्यास सांगत आहेत, जेणेकरून त्यांची दोन्ही कामे पूर्ण होतील. राहण्यासोबतच त्यांच्या शरीराची तपासणीही होईल आणि पैशांचीही बचत होईल.
IND vs PAK clash pic.twitter.com/XFRXIyzXvH
— RVCJ Media (@RVCJ_FB) July 21, 2023
हेही वाचा – महिनाभर मांसाहार न केल्यास काय होईल? जाणून घ्या आश्चर्यकारक बदल!
इतर शहरांमध्येही अशीच परिस्थिती
दुसरीकडे, दुसरे डॉक्टर निखिल लाल यांनी सांगितले की, 15 ऑक्टोबरच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये 24 ते 48 तास राहण्यासाठी बरीच चौकशी केली जात आहे, कारण आमच्याकडे बॉडी चेकअपचे पॅकेज आहे. याचे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. विश्वचषकापूर्वी आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामना होण्याची शक्यता आहे. वनडे फॉरमॅटचे हे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
एकदिवसीय विश्वचषकातील रेकॉर्ड
एकदिवसीय विश्वचषकाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 7 सामने झाले असून सर्व सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले आहे. वर्ल्ड कपमध्ये जून 2019 मध्ये मँचेस्टरमध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी मोठा विजय मिळवला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!