World Cup 2023 IND vs PAK : क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान म्हटलं की वेगळाच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतो. या वर्षीच्या क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबाद येथे ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे विमान भाड्यात प्रचंड वाढ होत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की दिल्ली ते अहमदाबाद या सिंगल नॉन-स्टॉप इकॉनॉमी क्लासचे भाडे 9,011 ते 24,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. MakeMyTrip आणि ixigo च्या मते, मुंबई ते अहमदाबाद एकेरी सिंगल -स्टॉप इकॉनॉमी क्लास फ्लाइट तिकिटांची किंमत रु. 10,517 ते रु. 24,189 आहे.
दोन्ही देशांमधील सामन्यादरम्यान विमान तिकिटांच्या मागणीत कमालीची वाढ होते. त्यामुळेच विमान तिकीट बुकिंग वेबसाइटवर तिकीट दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. EaseMyTrip चे सीईओ आणि सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, ”आमच्या वेबसाइटवर फ्लाइट तिकीट शोधणाऱ्या लोकांची संख्या आतापर्यंत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सामना पाहण्यासाठी इच्छुकांनी तिकीट काढण्यास सुरुवात केली आहे.”
हेही वाचा – Wimbledon 2023 : जोकोविचचं सरकार पडलं, विम्बल्डनला मिळाला ‘नवा’ मुख्यमंत्री!
हॉटेलच्या खोलीचे भाडे…
भारत-पाकिस्तान सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेलच्या खोलीचे भाडेही 10 पटीने वाढले आहे. आलिशान हॉटेल्स एका रात्रीचे भाडे 40,000 ते एक लाख रुपये आकारत आहेत. अनेक हॉटेलांनी 15 ऑक्टोबरची तिकिटे आधीच बुक केली आहेत. ITC नर्मदा, कोर्टयार्ड बाय मॅरियट, हयात आणि ताज स्कायलाइन अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरसाठी भाड्याने खोल्या उपलब्ध नाहीत.
लक्झरी हॉटेल्समधील खोलीचे भाडे सामान्य दिवसांमध्ये 5,000 ते 8,000 रुपयांपर्यंत असते. गुजरात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे (एचआरए) अध्यक्ष नरेंद्र सोमाणी म्हणाले की, बहुतांश अनिवासी भारतीय आणि उच्च मध्यमवर्गीय क्रिकेट चाहत्यांच्या मागणीनुसार हॉटेल्सचे दर वाढले आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!