भारताची हवा टाईट केली, वानखेडेवर लोकांना गप्प केलं, कोण आहे डॅरिल मिचेल?

WhatsApp Group

वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला (IND vs NZ) 70 धावांनी हरवून वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत एकहाती सामना जिंकणाऱ्या भारताला सेमीफायनलमध्ये बराच घाम गाळावा लागला. एक मजबूत संघातही काही कमकुवतपणा असतात, त्या न्यूझीलंडने अचूक हेरून भारताला बऱ्यापैकी थकवले. केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल यांनी रेकॉर्ड पार्टनरशिप करत आपण ऐतिहासिक सामना पुन्हा गमावणार, अशी शंका प्रत्येक भारतीयाच्या मनात आणली. 397 रन्स मारूनही आपण सेफ झोनमध्ये नाही हे भारताला वाटू लागले होते.

40 धावांत पहिल्या दोन विकेट पडल्यानंतर विल्यमसनने स्कोरबोर्ड हलता ठेवला आणि मिचेलने पुन्हा भारताला दणके द्यायला सुरुवात केली. बुमराह, शमी आणि सिराज या घातक त्रिकुटाला टेन्शन देण्यात मिचेलने कोणतीही कसर ठेवली नाही. आठव्या ओव्हरपासून ते तिसाव्या ओव्हरपर्यंत वानखेडे शांत ठेवण्यात मिचेलने खणखणीत भूमिका बजावली. मोहम्मद शमीने विल्यमसनची विकेट काढली आणि मिचेलनेही आपला सूर घालवला. स्पर्धेतील सर्वात शक्तिशाली बॉलिंग अटॅकसमोर मिचेलने 9 चौकार आणि 7 षटकारांसह 134 धावांची दिवाळी साजरी केली. रवींद्र जडेजाला ठोकलेला 107 मीटरचा षटकार मिचेलच्या (Daryl Mitchell) शक्तीचे वर्णन करणारा होता.

मिचेलचे या स्पर्धेतील दुसरे शतक ठरले. पहिले शतकही त्याने आपल्याविरुद्धच झळकावले. त्या दिवशीही मिचेलने 9 चौकार आणि 5 षटकार मारले होते. डॅरिल मिचेलला न्यूझीलंड संघात सामील व्हायला खूप वेळ लागला. 2019 मध्ये, जेव्हा कॉलिन डी ग्रँडहोमे जायबंदी झाला, तेव्हा मिचेलला बदली खेळाडू म्हणून आणण्यात आले. त्याने पहिल्याच डावात इंग्लंडविरुद्ध 73 धावांची खेळी करून सर्वांना थक्क केले. घरच्या मैदानावर त्याने चांगली बॉलिंगही केली होती.

मिचेलचे भारताशी जुने नाते आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये, त्याने भारताविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दोन वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिले शतक झळकावले. 2021 पासून तो संघात कायमचा झाला होता, मात्र, 2022 मध्ये न्यूझीलंडचा इंग्लंड दौरा खराब राहिला. किवी संघाने तिन्ही टेस्ट घालवल्या, पण मिचेल दोन अर्धशतके आणि तीन शतकांसह चमकला. तेव्हा पहिल्यांदा जगाने मिचेलला एक खमका फलंदाज म्हणून ओळखले होते.

हेही वाचा – समुद्री शेवाळापासून तयार केलेले खत, पिकांसाठी आणि मातीसाठी वरदान

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद आणि भारताच्या मध्ये उभा ठाकलेला रॉस टेलर जेव्हा निवृत्त झाला, तेव्हा न्यूझीलंडला भक्कम मधल्या फळीत एका फलंदाजाची गरज होती. त्यासाठी मिचेल एकदम फिट होता. याच संधीचे त्याने सोने केले.

सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार, डॅरिल मिचेल हा न्यूझीलंडमधील क्रिकेटच्या ऑफ सीझनमध्ये रग्बी संघाचा स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक होता. न्यूझीलंडमध्ये रग्बी खूप लोकप्रिय आहे. या कनेक्शनमुळे मिचेलकडे फिटनेस आणि खेळपट्टीवर तग धरण्याची क्षमता दिसते. मुंबईच्या वातावरणात 50 ओव्हर्स फिल्डिंग करून 30 ओव्हर्स बॅटिंग करून आपण कोणत्याही फिटनेस फ्रीक खेळाडूपेक्षा कमी नाही हे मिचेलने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. मिचेलने वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रमही केली आहे. त्याने ब्रँडन मॅक्क्युलमला मागे सोडले.

  • 20 – डॅरिल मिचेल, 2023
  • 17 – ब्रेंडन मॅक्क्युलम, 2015
  • 17 – रचिन रवींद्र, 2023
  • 16 – मार्टिन गुप्टिल, 2015
  • 14 – रॉस टेलर, 2011

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment