World Cup 2023 IND vs AUS Virat Kohli : विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने 85 धावांची शानदार खेळी केली. यासोबतच त्याने क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी कोहलीला पदक देण्यात आले. विशेष म्हणजे जेव्हा कोहलीला क्षेत्ररक्षणासाठी पदक दिले जात होते, तेव्हा श्रेयस अय्यर आणि इशान किशनचेही कौतुक करण्यात आले.
भारतीय संघाने ड्रेसिंग रूममध्ये चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी पदक दिले. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी इशान किशन आणि श्रेयस अय्यरचे कौतुक केले. अय्यर आणि किशनने चांगले क्षेत्ररक्षण केले. पण विराट कोहलीने (Virat Kohli Latest News In Marathi) एकंदरीत चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या सहकारी खेळाडूंनाही मदत केली, असे ते म्हणाले. याच कारणामुळे कोहलीला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पदक देण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे.
हेही वाचा – Gold Silver Price Today In Marathi : युद्धामुळे सोने-चांदी महागले! चेक करा आजचा भाव
विराट कोहली (Virat Kohli News In Marathi) जेव्हा पदक घेण्यासाठी आला, तेव्हा त्याची शैली खूपच मनोरंजक होती. कोहलीला खूप आनंद झाला. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कोहलीला पदक देत होते. पण त्याने ते पदक गळ्यात घालण्यास सांगितले.
कोहलीने (Virat Kohli Best Fielder Medal News In Marathi) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 116 चेंडूंचा सामना करत 85 धावा केल्या होत्या. या कालावधीत 6 चौकार मारले. कोहलीने दोन झेलही घेतले. त्याने मिचेल मार्शचा सूर मारत झेल घेतला. त्याची खूप प्रशंसा झाली. विराटने अॅडम झाम्पाचाही झेल घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताला 200 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 41.2 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!