IND vs AUS Players Injured News In Marathi : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा महत्त्वाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा दुखापतग्रस्त झाला आहे. स्विमिंग करताना त्याला दुखापत झाली. कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले आहे की झाम्पाची दुखापत गंभीर नाही आणि तो भारताविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग-11 चा भाग असेल.
पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत सांगितले, “अॅडम झाम्पा स्विमिंग पूलमधील शिडीला धडकला होता. पोहताना त्याचे डोळे मिटले आणि त्याला वाटले की आपण सरळ पोहत आहोत पण तसे झाले नाही आणि तो पूलच्या शिडीला धडकला. त्यामुळे त्यांच्या नाकाजवळ एक कट पडला होता. सुदैवाने त्याची दुखापत फार खोल नव्हती. त्याला फक्त सौम्य सूज आहे. तो आता पूर्वीपेक्षा चांगला आहे आणि सामन्यात प्रवेश करण्यास पूर्णपणे तयार आहे.”
हेही वाचा – IND Vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे हवीयत? जाणून घ्या कशी खरेदी कराल!
झाम्पा भारताविरुद्ध खेळण्यास तयार असल्याचे कर्णधाराने स्पष्ट केले आहे. तसे झाले नाही तर ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का असेल कारण झाम्पा हा संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे आणि मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो आणि या काळात तो खूप प्रभावी असतो. केवळ धावाच थांबवत नाही, तर विकेटही घेतो. 2019 च्या विश्वचषकानंतर त्याने मधल्या षटकांमध्ये सर्वाधिक 58 बळी घेतले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियाच्या मधल्या षटकांमध्ये जोश हेझलवूड हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 16 विकेट घेतल्या आहेत.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!