Glenn Maxwell Accident News In Marathi : ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकात (World Cup 2023) चमकदार कामगिरी करत आहे. सलग दोन पराभवांसह सुरुवात केलेल्या या संघाने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे चार सामने जिंकले. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. आता त्यांचा पुढील सामना शनिवारी (4 नोव्हेंबर) खेळायचा आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. शानदार फॉर्मात असलेला स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा अपघात झाला असून तो पुढील सामन्यात तो खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG vs AUS) यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मॅक्सवेल सोमवारी क्रिकेटऐवजी गोल्फ खेळत होता. यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला. आता तो पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. त्याला बरे होण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागतील, असे मानले जात आहे.
हेही वाचा – NTPC मध्ये भरती! 90 हजार रुपये पगार, ‘असा’ भरा अर्ज
दुखापत फार गंभीर नाही
ईएसपीएनक्रिकइन्फोने आपल्या अहवालात मॅक्सवेलला सोमवारी दुखापत झाल्याचे वृत्त दिले आहे. तो क्लब हाऊसमध्ये गोल्फ खेळत होता. त्याचा सहकारी स्टीव्ह स्मिथनेही गोल्फ खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऑस्ट्रेलिया संघाचे अनेक खेळाडू दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले की, मॅक्सवेल आपल्या खेळाबाबत प्रामाणिक आहे. तो लवकरच परत येईल. मॅक्सवेलची दुखापत फारशी गंभीर नाही हे सुदैवाचे आहे. या प्रकारच्या दुखापतीमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असू शकते. तो केवळ एका सामन्यासाठी बाद होईल अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षीही मॅक्सवेलला दुखापत
स्टार अष्टपैलू मॅक्सवेल गेल्या वर्षी दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो दुखापतग्रस्त झाला. घसरल्यामुळे त्याचा पाय मोडला. पाच महिने तो मैदानापासून दूर होता. मॅक्सवेलने या विश्वचषकात अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. त्याने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!