World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने उघडले ‘अकाऊंट’, श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव!

WhatsApp Group

World Cup 2023 AUS vs SL In Marathi : विश्वचषक 2023 चा 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात लखनऊमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने लंकेचा 5 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपले विश्वचषकात विजयाचे खाते उघडले, तर श्रीलंकेला सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कांगारू संघासमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही पण, मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस यांच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव (AUS vs SL) 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला. श्रीलंकेला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 61 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कुसल परेरा 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला. फक्त 84 धावांत लंकेने 9 विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. ग्लेन मॅक्सवेलने 1 विकेट घेतली.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. डेव्हि़ड वॉर्नर (11) स्वस्तात बाद झाला. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. दिलशान मधुशंकाने दोघांना पायचीत पकडले. पण मिचेल मार्श (52) आणि जोस इंग्लिस (58) यांनी अर्धशतके करत संघाला विजयाकडे नेले. मार्नस लाबुशेननेही 40 धावांची खेळी केली. लंकेकडून मधुशंकाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Train Ticket : ट्रेनचे तिकीट ऑनलाईन कसे काढाल? जाणून घ्या सोपी प्रोसेस!

दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 AUS vs SL)

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कप्तान), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कप्तान), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालागे, महेश थिक्षणा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment