World Cup 2023 AUS vs SA In Marathi : स्पर्धेत दमदार खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकाने आयसीसी वनडे विश्वचषकात दुसरा विजय नोंदवला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात प्रोटीज संघाने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव करत एकतर्फी विजयाची नोंद केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 7 गडी गमावून 311 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 177 धावांत गडगडला. या विजयासह आफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात तब्बल 6 झेल सोडले.
डी कॉकचे सलग दुसरे शतक (World Cup 2023 AUS vs SA)
या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने सुंदर शतक साकारले. त्याने कप्तान टेम्बा बावुमासह पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारीही रचली. नंतर डी कॉकने रॅसी व्हॅन डर डुसेनसह अर्धशतकी भागीदारी केली. डी कॉकने 8 चौकार आणि 5 षटकारांसह 109 धावांची खेळी केली. मागील सामन्यात वेगवान शतक केलेल्या एडन मार्करामने आज 7 चौकार आणि एका षटकारासह 56 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकात ऑस्ट्रेलियाने विकेट्स काढत आफ्रिकेला अतिरिरक्त 20-30 धावांपासून दूर ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – VIDEO : क्विंटन डी कॉकने ऑस्ट्रेलियाचा काढला घाम, षटकार मारून ठोकले शतक!
ऑस्ट्रेलिया कोसळली! (AUS vs SA News In Marathi)
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 312 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कोसळली. निम्म्याहून अधिक संघ 70 धावांवर परतला होता. मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारखे दिग्गज वैयक्तिक 20 धावांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मार्नस लाबुशेन आणि पॅट कमिन्स यांनी संघर्ष केला परंतु संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरता आले नाही. लाबुशेन 46 धावा करून बाद झाला तर मिचेल स्टार्कने 27 आणि कमिन्सने 22 धावा केल्या. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!