World Cup 2023 AUS vs SA In Marathi : वर्ल्डकप 2023चा 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. लखनऊमध्ये रंगत असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे गचाळ क्षेत्ररक्षण आणि क्विंटन डी कॉकचे सलग दुसरे शतक दक्षिण आफ्रिकेला तीनशेपार धावसंख्येकडे घेऊन गेले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 6 झेल सोडले. आफ्रिकेने 50 षटकात 7 बाद 311 धावा केल्या.
डी कॉकचे सलग दुसरे शतक (World Cup 2023 AUS vs SA)
या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने सुंदर शतक साकारले. त्याने कप्तान टेम्बा बावुमासह पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारीही रचली. नंतर डी कॉकने रॅसी व्हॅन डर डुसेनसह अर्धशतकी भागीदारी केली. डी कॉकने 8 चौकार आणि 5 षटकारांसह 109 धावांची खेळी केली. मागील सामन्यात वेगवान शतक केलेल्या एडन मार्करामने आज 7 चौकार आणि एका षटकारासह 56 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकात ऑस्ट्रेलियाने विकेट्स काढत आफ्रिकेला अतिरिरक्त 20-30 धावांपासून दूर ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांची Playing 11 (AUS vs SA News In Marathi)
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!