Women’s T20 World Cup 2024 : आजपासून वर्ल्डकप! जाणून घ्या मॅच टायमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंग आणि भारताचे सामने

WhatsApp Group

Women’s T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 विश्वचषक आज गुरुवार 3 ऑक्टोबरला डबल हेडरने सुरू होईल. दुपारी 3.30 पासून बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाईल. ही स्पर्धा आधी बांगलादेशमध्ये खेळवली जाणार होती, परंतु बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये हलवण्यात आली. अधिकृतपणे बांगलादेश यजमान राहील.

विशेष बाब म्हणजे स्कॉटलंडचा संघ प्रथमच आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याचवेळी डबल हेडरचा दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. भारतीय महिला संघ उद्या 4 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ 2020 मध्ये एकमेव टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण विजेतेपदाची संधी गमावली. अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषकाचा दुष्काळ संपवेल, अशी भारतीय चाहत्यांना पूर्ण आशा आहे.

हेही वाचा – सगळंच विचित्र! ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस आणि…., भारतीय हवामान खात्याचा अंदाज

तुम्ही Disney Plus Hotstar वर महिला टी-20 विश्वचषक 2024 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. महिला टी-20 विश्वचषक 2024 भारतातील टीव्हीवर थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल.

भारतीय संघाचे सामने

4 ऑक्टोबर – विरुद्ध न्यूझीलंड – संध्याकाळी 7.30 पासून
6 ऑक्टोबर – विरुद्ध पाकिस्तान – दुपारी 3.30 पासून
9 ऑक्टोबर – विरुद्ध श्रीलंका – संध्याकाळी 7.30 पासून
13 ऑक्टोबर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – संध्याकाळी 7.30 पासून

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment