आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच गटात, ‘या’ तारखेला सामना!

WhatsApp Group

Womens Asia Cup 2024 Schedule | आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा श्रीलंकेतील डंबुला येथे आयोजित केली जाणार आहे. पहिला सामना 19 जुलै रोजी होणार आहे. तर अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे संघ यंदा एकाच गटात आहेत. या वर्षीची सर्वात वेगळी बाब म्हणजे या हंगामात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. गेल्या हंगामात या स्पर्धेत केवळ 7 संघ सहभागी होऊ शकले होते.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “खेळाडू आणि चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या एका रोमांचक स्पर्धेची वाट पाहत आहोत. महिला टी-20 आशिया कप 2024 महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ACC ची वचनबद्धता अधोरेखित करते. या क्षेत्रातील सतत वाढत चाललेली स्पर्धा पाहून आम्ही खूप उत्सुक आहोत.”

हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर!

यंदाच्या मोसमात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 21 जुलैला सामना रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि यूएई या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंडचे संघ आहेत. गेल्या वर्षी भारताने आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले होते. भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता.

आशिया कप 2024 वेळापत्रक :

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – शुक्रवार 19 जुलै
भारत विरुद्ध यूएई – शुक्रवार 19 जुलै
मलेशिया विरुद्ध थायलंड – शनिवार 20 जुलै
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – शनिवार 20 जुलै
नेपाळ विरुद्ध यूएई – रविवार 21 जुलै
भारत विरुद्ध पाकिस्तान – रविवार 21 जुलै
श्रीलंका विरुद्ध मलेशिया – सोमवार 22 जुलै
बांगलादेश विरुद्ध थायलंड – सोमवार 22 जुलै
पाकिस्तान विरुद्ध यूएई – मंगळवार 23 जुलै
भारत विरुद्ध नेपाळ- मंगळवार 23 जुलै
बांगलादेश विरुद्ध मलेशिया – बुधवार 24 जुलै
श्रीलंका विरुद्ध थायलंड – बुधवार 24 जुलै
उपांत्य फेरी 1- शुक्रवार 26 जुलै
उपांत्य फेरी 2- शुक्रवार 26 जुलै
फायनल – रविवार 28 जुलै

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment