WI vs IND 5th T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. फ्लोरिडामध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही संघांमधील मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा टी-20 सामना जिंकला तर कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत ते पाकिस्तान संघाबरोबर पोहोचतील. पाकिस्तानने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 34 पैकी 20 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 29 टी-20 सामने खेळून 19 सामने जिंकले आहेत. विंडीज जिंकल्यास ते भारताविरुद्ध प्रथमच 5 सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकतील.
India win the toss and will bat first in the series decider 👀#WIvIND | 📝: https://t.co/siegjjubso pic.twitter.com/8a1e5ZSkKZ
— ICC (@ICC) August 13, 2023
हेही वाचा – ‘या’ तारखेला मिळणार भारत-पाक वर्ल्डकप मॅचची तिकीटे, जाणून घ्या डिटेल्स!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, रॉस्टन चेस.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!