WI vs IND 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने सलग दोन सामने जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवची अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला मालिकाविजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले आहे.
भारताचा डाव
यशस्वी जयस्वाल (5) आणि शुबमन गिल (9) या सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करत 50 धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमार यादवच्या साथीने जोरदार फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माला रोस्टन चेसने त्याच्या चेंडूवर अप्रतिम झेल घेऊन बाद केले. 27 धावांची छोटी पण उत्कृष्ट खेळी केल्यानंतर तो बाद झाला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने त्याच्या वाट्याला आलेली आणखी एक मोठी संधी गमावली. या सामन्यात तो केवळ 13 धावा करून बाद झाला. निकोलस पूरनने रोमॅरियो शेफर्डच्या चेंडूवर विकेटच्या मागे त्याचा अप्रतिम झेल टिपला. सूर्यकुमारने 45 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. कर्णधार हार्दिक पंड्या 14 धावा करून झेलबाद झाला. 20 षटकात भारताने 9 बाद 165 धावा केल्या. विंडीजकडून शेफर्डने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – ChatGPT बनवणारी कंपनी देतेय नोकरी, ₹3.7 कोटींपर्यंत मिळेल पॅकेज!
Innings Break!
Suryakumar Yadav scored a cracking 6⃣1⃣ as #TeamIndia posted 1⃣6⃣5⃣/9⃣ on the board in the T20I series decider!
Over to our bowlers now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/YzoQnY6OpV#WIvIND pic.twitter.com/W8Hkz3iZC9
— BCCI (@BCCI) August 13, 2023
दोन्ही संघांची Playing 11
भारत – यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, रॉस्टन चेस.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!