WI vs IND 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि शेवटचा सामना फ्लोरिडात खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी संथ असल्यामुळे भारताने स्वस्तात दोन्ही सलामीवीरांना गमावले. त्यात शुबमन गिल फारच अनलकी ठरला.
शुबमनने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती, त्याने चौकारही ठोकला. पण अकिल हुसेनने त्याला पायचित पकडले. शुबमनने डीआरएसही घेतला नाही. त्याने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवलाही विचारले, तेव्हा सूर्यानेही त्याला ”तू OUT आहेस”, असे सांगितले. शुबमनलाही त्याचे मत पटले. तो पॅव्हेलियनकडे गेला. पण त्यानंतर काही चेंडूनंतर शुबमनचे पायचित डीआरएसमध्ये दाखवण्यात आले. तेव्हा चेंडू स्टम्प्सला लागत नसल्याचे समजले. अनलकी शुबमनला पंचांनी चुकीचे बाद दिले. शुबमनने या सामन्यात फक्त 9 धावा केल्या.
The class of Shubman Gill.
He played some ridiculous shots in the 4th T20I. pic.twitter.com/v3YJfP4SJG
— Johns. (@CricCrazyJohns) August 12, 2023
Unlucky Shubman Gill…!!!
It was missing but he didn't take the review. pic.twitter.com/s5K3TasyUZ
— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2023
हेही वाचा – WI vs IND 5th T20 : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांची Playing 11
दोन्ही संघांची Playing 11
भारत – यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, रॉस्टन चेस.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!