WI vs IND 3rd T20 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज तिसर्या टी-20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम ब्रँडन किंग आणि त्यानंतर कप्तान पॉवेलच्या फटकेबाजीमुळे विंडीजने भारताला 160 धावांचे लक्ष्य दिले आहे. ही या मालिकेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
वेस्ट इंडिजचा डाव
विंडीजने पहिल्या 6 षटकात कोणतेही बिनबाद 38 धावा केल्या. काइल मेयर्स आणि ब्रँडन किंग या सलामी जोडीने 55 धावा फलकावर लावल्या. अक्षर पटेलने मेयर्सला (25) बाद करत वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने चार्ल्सला (12) माघारी धाडले. निकोलस पूरनने झटपट 20 धावा जोडल्या, पण कुलदीपच्या गोलंदाजीवर तो फसला. कुलदीपने ब्रँडन किंगलाही अर्धशतकापासून रोखले. किंगने 5 चौकार आणि एका षटकारासह 42 धावा केल्या. शेवटच्या षटकात कप्तान रोव्हमन पॉवेलने मोठे फटके खेळले. वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या. पॉवेलने 3 षटकार आणि एका चौकारासह नाबाद 40 धावा केल्या. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
West Indies make 159-5 in their 20 overs, with Rovman Powell making 40* in 19 balls.
Axar Patel, Mukesh Kumar picked up a wicket each, while Kuldeep scalped three. #WIvsIND pic.twitter.com/yewv61Bf2H
— Wisden India (@WisdenIndia) August 8, 2023
हेही वाचा – कावासाकी लव्हर्स…ही बातमी तुमच्यासाठी, लाँच झाली 7.16 लाखांची बाईक!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!