WI vs IND 3rd T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना आज खेळवला जात आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होत आहे. पहिले 2 टी-20 सामने जिंकल्यानंतर विंडीजचा संघ मालिकेत 2-0 ने पुढे आहे. मालिकेत जिवंत राहण्यासाठी हार्दिक पांड्या आणि कंपनीला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. कुलदीप यादवलाही संधी मिळाली आहे. इशान किशन आणि रवी बिश्नोई संघाबाहेर आहे. भारतीय संघाला 7 वर्षांनंतर विंडीजविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका गमावण्याचा धोका आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली. मधल्या फळीलाही दबाव सहन करता आला नाही. भारतीय संघाने शेवटची टी-20 मालिका 2016 मध्ये विंडीजविरुद्ध गमावली होती. त्यानंतर विंडीजने 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला.
West Indies won the toss & decided to bat first. pic.twitter.com/wrqu5F9io9
— Johns. (@CricCrazyJohns) August 8, 2023
हेही वाचा – जास्त झोप घेण्यामुळे आजार होतात का? यावर उपाय काय? जाणून घ्या!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!