WI vs IND 3rd T20 : भारताचा पलटवार, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पाडाव!

WhatsApp Group

WI vs IND 3rd T20 : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी-20 सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिकेत विजयाचे खाते उघडले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम ब्रँडन किंग आणि त्यानंतर कप्तान पॉवेलच्या फटकेबाजीमुळे विंडीजने भारताला 160 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या योगदानामुळे भारताने हा सामना 18व्या षटकातच संपवला.

वेस्ट इंडिजचा डाव

विंडीजने पहिल्या 6 षटकात कोणतेही बिनबाद 38 धावा केल्या. काइल मेयर्स आणि ब्रँडन किंग या सलामी जोडीने 55 धावा फलकावर लावल्या. अक्षर पटेलने मेयर्सला (25) बाद करत वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने चार्ल्सला (12) माघारी धाडले. निकोलस पूरनने झटपट 20 धावा जोडल्या, पण कुलदीपच्या गोलंदाजीवर तो फसला. कुलदीपने ब्रँडन किंगलाही अर्धशतकापासून रोखले. किंगने 5 चौकार आणि एका षटकारासह 42 धावा केल्या. शेवटच्या षटकात कप्तान रोव्हमन पॉवेलने मोठे फटके खेळले. वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या. पॉवेलने 3 षटकार आणि एका चौकारासह नाबाद 40 धावा केल्या. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – कावासाकी लव्हर्स…ही बातमी तुमच्यासाठी, लाँच झाली 7.16 लाखांची बाईक!

भारताचा डाव

भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या यशस्वी जयस्वालला फक्त 1 धाव करता आली. शुबमन गिलही फ्लॉप ठरला. या सामन्यातही त्याने अवघ्या 6 धावांत आपली विकेट गमावली. ओबेद मॅक्कॉयने यशस्वीला तर अल्झारी जोसेफने शुबमनला बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने किल्ला लढवला. सूर्यकुमारने 10 चौकार आणि 4 षटकारांसह 83 धावा केल्या. सूर्याला अल्झारी जोसेफने बाद केले. त्यानंतर तिलक वर्माने अर्धशतक कूच करत संघाला विजयाकडे नेले. तिलकने 4 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 49 धावा केल्या. हार्दिक 20 धावांवर नाबाद राहिला. भारताने 17.5 षटकारात विजय मिळाला. वेस्ट इंडिजकडून अल्झारीने सर्वाधिक 2 बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment