WI vs IND 3rd T20 : मॅच सुरू होणार इतक्यात लक्षात आली चूक, खेळाडूंनी सोडलं मैदान!

WhatsApp Group

WI vs IND 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज खेळवला जात आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होत असून या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरू होणार इतक्यात एक मोठी चूक झाली. मैदानावर खेळाडू पोहोचले असताना त्यांना पुन्हा पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले.

नक्की घडलं काय?

या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ब्रेंडन किंग आणि काइल मेयर्स मैदानात आले. भारतीय खेळाडूही क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होत होते. इतक्यात त्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. मैदानात 30-यार्ड सर्कल तयार केलेले नव्हते. त्यामुळे खेळाडूंना मैदानातून बाहेर जाण्यास सांगितले गेले. वास्तविक याला पंचांची चूक मानली जाते. कारण सामना सुरू होण्यापूर्वी पंचांनी मैदानाची पाहणी करणे आवश्यक असते.

हेही वाचा – WI vs IND 3rd T20 : भारताला मिळाला नवा ओपनर, विंडीजची पहिली बॅटिंग!

या सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. कुलदीप यादवलाही संधी मिळाली आहे. इशान किशन आणि रवी बिश्नोई संघाबाहेर आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment