WI vs IND 3rd ODI : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. त्रिनिदादमध्ये रंगलेला तिसरा आणि निर्णायक वनडे सामना भारताने 200 धावांनी जिंकला. या सामन्यात टॉस हरलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. भारताकडून इशान किशन, शुबमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांनी अर्धशतके ठोकली. विंडीजचा संघ हे आव्हान पेलू शकला नाही. ते 35.2 षटकात 151 धावांतच ऑलआऊट झाले.
भारताचा डाव
सलामीवीर इशान किशन आणि शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी 143 धावा केल्या. इशानने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 77 तर शुबमन गिलने 11 चौकारांसह 85 धावा केल्या. मधल्या फळीत संजू सॅमसनने 2 चौकार आणि 4 षटकारांसह वेगवान 51 धावा केल्या. शेवटच्या षटकात कप्तान हार्दिक पांड्याने दमदार फलंदाजी केली. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 70 धावा केल्या. भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक 2 बळी घेतले.
No Virat Kohli or Rohit Sharma, but India faced no problems in the series decider!
They beat West Indies 2-1, making it their 13th consecutive bilateral series win 🏆 https://t.co/xhRJRqsKXp #WIvIND pic.twitter.com/LBoScDGiYZ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 1, 2023
हेही वाचा – VIDEO : याला म्हणतात जिगर..! मैदानात येताच संजू सॅमसनचा खणखणीत SIX
वेस्ट इंडिजचा डाव
भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने विंडीजची वरची फळी गारद केली. त्याने ब्रँडन किंग (0), काइल मेयर्स (4), शाई होप (5) यांना बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने दोन विकेट घेत विंडीजचा कणा मोडला. अवघ्या 40 धावांवर विंडीजचा अर्धा संघ बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने 3 विकेट घेत विंडीजला डाव संपुष्टात आणला. त्यांच्याकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक नाबाद 39 धावांची खेळी केली. भारताकडून मुकेश कुमारने 3, शार्दुल ठाकूरने 4, कुलदीप यादवने 2 बळी घेतले.
सर्वाधिक सलग द्विपक्षीय एकदिवसीय मालिकाविजय
- 13*भारत विरुद्ध वि. वेस्ट इंडिज (2007-23)
- 11 पाकिस्तान वि. झिम्बाब्वे (1996-21)
- 10 पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज (1999-22)
- 10 भारत वि. श्रीलंका (2007-23)
दोन्ही संघांची Playing 11
भारत – इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जायडेन सील्स.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!