WI vs IND 3RD ODI : भारी खेळला भारत! संजूची बहारदार इनिंग, विंडीजला मोठं टार्गेट!

WhatsApp Group

WI vs IND 3RD ODI : त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक वनडे सामना खेळला जात आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी केलेल्या उत्तम खेळींमुळे भारताने वेस्ट इंडिजला 352 धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून इशान किशन, शुबमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांनी अर्धशतके ठोकली.

भारताचा डाव

सलामीवीर इशान किशन आणि शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी 143 धावा केल्या. इशानने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 77 तर शुबमन गिलने 11 चौकारांसह 85 धावा केल्या. मधल्या फळीत संजू सॅमसनने 2 चौकार आणि 4 षटकारांसह वेगवान 51 धावा केल्या. शेवटच्या षटकात कप्तान हार्दिक पांड्याने दमदार फलंदाजी केली. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 70 धावा केल्या. भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक 2 बळी घेतले.

हेही वाचा – VIDEO : याला म्हणतात जिगर..! मैदानात येताच संजू सॅमसनचा खणखणीत SIX

दोन्ही संघांची Playing 11

भारत – इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जायडेन सील्स.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment