VIDEO : याला म्हणतात जिगर..! मैदानात येताच संजू सॅमसनचा खणखणीत SIX

WhatsApp Group

Sanju Samson : भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (WI vs IND 3RD) एकदिवसीय मालिका खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी ही खेळाडूंची चाचणी मानली जात आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन या संधीचा पुरेपूर फायदा घेत आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याने अर्धशतक केले आहे. इशाननंतर संजू सॅमसन मैदानात येताच आक्रमक रुप धारण केले आहे.

ऋतुराज गायकवाडची विकेट पडल्यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर यानिक कॅरियाला लाँग ऑनला षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर संजूने लाँग ऑफला षटकार खेचला. त्यानंतर 27व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजूने जायडेन सील्सला मिड विकेटला षटकार ठोकला. त्याची आक्रमक खेळी पाहून सर्व थक्क झाले.

हेही वाचा – Mahindra Thar EV : 15 ऑगस्टची मोठी तयारी, महिंद्रा आणणार इलेक्ट्रिक थार!

इशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. तिसऱ्या त्याने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा केल्या. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे इशान किशन आणि संजू सॅमसन यांची भारतीय संघातील स्थानासाठी चढाओढ सुरू आहे. इशानने त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेतला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जायडेन सील्स.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment