WI vs IND 2nd Test : किंग विराट कोहलीचे ‘विक्रमी’ शतक! सचिन तेंडुलकरला टाकले मागे

WhatsApp Group

WI vs IND 2nd Test Virat Kohli Century : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात संस्मरणीय शतक ठोकले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. विराटच्या शतकानंतर भारताच्या 4 बाद 317 धावा झाल्या होत्या. रवींद् जडेजानेही अर्धशतक ठोकले.

सचिनला टाकले मागे

विराटचा हा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि त्याचे हे 29वे कसोटी तक एकूण 76वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. सचिनने आपल्या 500 आंतरराष्ट्रीय सामन्यात 75 शतके केली होती. यासह विराटने सचिनलाही मागे टाकले आहे. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 76 शतके पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – Weather Alert : 9 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत मेट्रो स्टेशन आणि शाळा बंद!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज – क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, कर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment