WI vs IND 2nd Test : भारताकडून ‘या’ खेळाडूचं पदार्पण! वेस्ट इंडिजने जिंकला टॉस

WhatsApp Group

WI vs IND 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा 100 वा कसोटी सामना असेल. या सामन्यात विंडीजचा कप्तान क्रेग ब्रेथवेटने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे वेस्ट इंडिजने गेल्या 21 वर्षांत भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकलेली नाही. कॅरेबियन संघाने शेवटच्या वेळी 2002 मध्ये भारताला कसोटीत पराभूत केले होते. भारताने डॉमिनिका येथे उभय देशांमधील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत जिंकली. त्या सामन्यात यशस्वी जयस्वालने पदार्पण करताना 171 धावांची खेळी केली आणि आर अश्विनने 12 बळी घेतले.

मुकेश कुमारचे पदार्पण

या सामन्यात आम्हाला पहिली फलंदाजी करायची होती, असे भारताचा कप्तान रोहित शर्मा टॉस दरम्यान म्हणाला. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पदार्पण करत आहे. शार्दुल ठाकूर संघाबाहेर आहे. विराट कोहलीचा हा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

हेही वाचा – WI Vs IND 2nd Test : आज ऐतिहासिक मॅच! मैदानात उतरताच विराटच्या नावावर होणार विक्रम

दोन्ही संघांची Playing 11

भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज – क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, कर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment