WI vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवला दुखापत झाली असून त्याच्याऐवजी रवी बिश्नोईला संधी मिळाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव झाला होता. अशा प्रकारे वेस्ट इंडिज मालिकेत 1-0 ने पुढे आहे.
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसोबतच, भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्येही वरचष्मा आहे. उभय संघांमधील मागील 8 द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारताने 6 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. वेस्ट इंडिजने 2016 आणि 2017 मध्ये भारताविरुद्ध सलग 2 मालिका जिंकल्या. तेव्हापासून भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 5 टी-20 मालिकेत सातत्याने पराभव केला आहे. यावेळीही भारतीय संघ जिंकल्यास वेस्ट इंडिजविरुद्धच्या द्विपक्षीय T20 मालिकेतील हा भारताचा सलग सहावा विजय असेल.
हेही वाचा – Independence Day : पोस्ट ऑफिसची घोषणा, आता ‘ही’ गोष्ट 25 रुपयांना मिळणार!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!