WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडीज संघ आज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आले आहेत. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत आहे. वेस्ट इंडिजचा कप्तान शाई होपने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा संघातून बाहेर आहेत.
भारतीय संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने 2006-07 पासून विंडीजवर वर्चस्व गाजवले आहे. गेल्या 17 वर्षांपासून टीम इंडिया कॅरेबियन संघाविरुद्ध वनडे मालिका जिंकत आहे. दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघ विंडीजविरुद्धची सलग 13वी वनडे मालिका आपल्या नावावर करेल.
🚨 Toss Update 🚨
West Indies win the toss and elect to field first in the 2nd ODI.
Follow the match – https://t.co/k4FosiRmuT#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/tEUAw1b07b
— BCCI (@BCCI) July 29, 2023
हेही वाचा – धनुषचा ‘कॅप्टन मिलर’, एका दिवसात 10 मिलियन व्ह्यूज, पाहा Teaser
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कप्तान), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!