WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावलेला भारत प्रथम फलंदाजी करत आहे. पहिल्या विकेटसाठी इशान किशन आणि शुबमन गिल यांनी 90 धावांची सलामी दिली. भारत मोठ्या धावसंख्येकडे वळेल, असे वाटत असताना फलंदाजांनी निराशा केली.
भारताने 113 धावांत 5 विकेट्स गमावल्या. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसल्याने इतर फलंदाजांना कामगिरी दाखवण्याची संधी होती, पण संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि कप्तान हार्दिक पांड्या अपयशी ठरले. संजूने 9, अक्षरने 1 तर हार्दिकने 7 धावा केल्या. वर्ल्डकपला थोडे दिवस शिल्लक असताना भारताची दुबळ्या वेस्ट इंडिजविरुद्धची ही अवस्था पाहून नेटकरी ट्रोल करत आहेत.
Vice-Captain Hardik 5 runs off 7 balls in first ODI,
Captain Hardik 7 runs off 14 balls in the second ODI.
ICT Captain🤝 Academy NBDC Department, nothing new 🙈 #WIvIND pic.twitter.com/w6xUx37XT8
— TukTuk Academy (@TukTuk_Academy) July 29, 2023
हेही वाचा – PM Shri Yojana : मोदी सरकारची ‘पंतप्रधान श्री योजना’ आहे तरी काय?
>No Allegations
>No Scandals
>No Drama
>No Rifts
>No Runs
>No PerformanceOnly PR and Remdi rona for place in team, Youngster Sanju Samson for you. 🔥 pic.twitter.com/rYgICIYT3g
— Mufaddal Vohra (@mufaddalVohraa) July 29, 2023
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कप्तान), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!