WI vs IND 2nd ODI : भारत 181 धावांवर ऑलआऊट, इशान किशनचे अर्धशतक

WhatsApp Group

WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज बार्बाडोसला खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला 181 धावांवर ऑलआऊट केले. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि विराट दुसऱ्या वनडेतून बाहेर आहेत तर हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

पहिल्या विकेटसाठी इशान किशन आणि शुबमन गिल यांनी 90 धावांची सलामी दिली. भारत मोठ्या धावसंख्येकडे वळेल, असे वाटत असताना फलंदाजांनी निराशा केली. भारताने 113 धावांत 5 विकेट्स गमावल्या. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसल्याने इतर फलंदाजांना कामगिरी दाखवण्याची संधी होती, पण संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि कप्तान हार्दिक पांड्या अपयशी ठरले. संजूने 9, अक्षरने 1 तर हार्दिकने 7 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने (24) थोडा प्रतिकार केला. शार्दुल ठाकूरने (16) भारतासाठी शेवटची दुहेरी धावसंख्या जोडली. भारताचा डाव 40.5 षटकात 181 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी 3-3 बळी घेतले.

हेही वाचा – न्या. देवेंद्र उपाध्याय यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

दोन्ही संघांची Playing 11

भारत – शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कप्तान), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाझे, शाई होप (विकेटकीपर/कप्तान), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment