WI vs IND 1st Test : पदार्पणातच यशस्वी जयस्वालची गरुडझेप! सचिन, शुबमनला टाकले मागे

WhatsApp Group

WI vs IND 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी आर अश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गारद केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बिनबाद 80 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी यशस्वीने पदार्पणातच अर्धशतक ठोकले, कर्णधार रोहितसह त्यानेही अर्धशतक पूर्ण केले. आज दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने बिनबाद 146 धावा केल्या होत्या.

यशस्वी जयस्वालने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि शुबमन गिल यांना मागे टाकून एक अनोखी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी यशस्वी जयस्वालची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 15 सामन्यांमध्ये 80.21 सरासरी होती. कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही तिसरी सर्वोच्च सरासरी आहे. विनोद कांबळी (88.37, 27 सामने) आणि प्रवीण अमरे (81.23, 23 सामने) यांची कसोटी पदार्पणापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली सरासरी होती. कसोटी पदार्पण करण्यापूर्वी, सचिन तेंडुलकरची 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सरासरी 70.18 होती तर गिलची 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सरासरी 68.78 होती.

हेही वाचा – MG ZS EV : सिंगल चार्जमध्ये 461 किमी धावणारी इलेक्ट्रिक कार लाँच झालीय!

अश्विनची कमाल  

भारतीय गोलंदाजांसमोर विंडीज संघाचे फलंदाज या सामन्यात विशेष काही करू शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा सलामीचा डाव 150 धावांवर आटोपला. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (आर अश्विन) दमदार गोलंदाजी करताना 5 बळी आपल्या नावावर केले. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 14 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. वेस्ट इंडिजकडून नवोदित अलिक अथानाजने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 99 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment