Yashasvi Jaiswal Maiden Test Hundred : भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या कसोटी पदार्पणातच शतक ठोकले आहे. डॉमिनिकामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (WI vs IND 1st Test) भारत आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वीने आपले शतक पूर्ण केले. भारताने आपल्या पहिल्या डावात दोनशे धावा पूर्ण केल्या आहेत. विंडीजला अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही. वेस्ट इंडिज पहिल्या डावात 150 धावांवर ऑलआऊट झाला.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही पहिल्या डावात आघाडी घेणारी पहिली भारतीय सलामी जोडी ठरली आहे. विंडसर पार्कवर ही जोडी संथ खेळपट्टीवर संयमी खेळी करत आहे. भारताकडे आता 50 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. भारताबाहेर पदार्पणात कसोटी शतक ठोकणारा यशस्वी हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
Great innings to remember for jaiswal
As he hits first test century on debut vs WI#YashasviJaiswal pic.twitter.com/sdOzS1mKb5— Navjeet (@THENAVJEETSINGH) July 13, 2023
Yashasvi Jaiswal hugged Rohit Sharma after reaching the century.
A beautiful moment! pic.twitter.com/RQg9UPGpdn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 13, 2023
हेही वाचा – MG ZS EV : सिंगल चार्जमध्ये 461 किमी धावणारी इलेक्ट्रिक कार लाँच झालीय!
Celebration by Yashasvi Jaiswal after completing the maiden Test hundred.
The great in making!! pic.twitter.com/wnk0V3XPhY
— Johns. (@CricCrazyJohns) July 13, 2023
A dream debut! 💯
Yashasvi Jaiswal becomes just the third Indian opener to make a Test hundred on debut 👏#WTC25 | #WIvIND | 📝: https://t.co/gPEvNeiqUe pic.twitter.com/bsIqz21cZ0
— ICC (@ICC) July 13, 2023
अश्विनची कमाल
भारतीय गोलंदाजांसमोर विंडीज संघाचे फलंदाज या सामन्यात विशेष काही करू शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा सलामीचा डाव 150 धावांवर आटोपला. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (आर अश्विन) दमदार गोलंदाजी करताना 5 बळी आपल्या नावावर केले. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 14 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. वेस्ट इंडिजकडून नवोदित अलिक अथानाजने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 99 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
दोन्ही संघांची Playing 11
भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!