Yashasvi Jaiswal Wicket : भारत आणि वेस्ट इंडिज (WI vs IND 1st Test) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (14 जुलै) टीम इंडियाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने 150 धावांचा टप्पा ओलांडला. सर्वांचे लक्ष त्याच्या द्विशतकाकडे लागले होते, पण त्याचे स्वप्न भंगले.
यशस्वीला द्विशतक करता आले नाही. 125व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. यशस्वीने 387 चेंडुंचा सामना करत 171 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी केली. भारताकडे आता दोनशेपेक्षा जास्त धावांची आघाडी आहे.
Yashasvi Jaiswal, remember the name.
A great start to his career and many more coming in future. pic.twitter.com/PzjjDxDjqY
— Johns. (@CricCrazyJohns) July 14, 2023
हेही वाचा – IND Vs SA : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! कधीपासून? किती सामने? जाणून घ्या!
1⃣7⃣1⃣ Runs
3⃣8⃣7⃣ Balls
1⃣6⃣ Fours
1⃣ SixYashasvi Jaiswal departs but not before he made a stunning start to his international career 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/Nsa8MAMe6z
— BCCI (@BCCI) July 14, 2023
भारतासाठी कसोटी पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्या
- 187 – शिखर धवन विरुद्ध AUS, मोहाली, 2013
- 177 – रोहित शर्मा विरुद्ध WI, कोलकाता, 2013
- 171 – यशस्वी जयस्वाल विरुद्ध WI, रोसेओ, 2023
- 137 – गुंडप्पा विश्वनाथ विरुद्ध AUS, कानपूर, 1969
- 134 – पृथ्वी शॉ विरुद्ध WI, राजकोट, 2018
21-year-old Yashasvi Jaiswal is an exceptional talent. pic.twitter.com/pWUdrhjtfq
— CricTracker (@Cricketracker) July 13, 2023
दोन्ही संघांची Playing 11
भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!