Yashasvi Jaiswal Abusing West Indies Player : यशस्वी जयस्वालने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची उत्तम सुरुवात केली आहे. आता त्याची नजर द्विशतकाकडे आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला पदार्पणाच्या कसोटीत ही कामगिरी करता आलेली नाही. डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs IND 1st Test) पहिल्या कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 बाद 312 धावा केल्या आहेत. 21 वर्षीय यशस्वी 143 धावांवर नाबाद आहे. कर्णधार रोहित शर्मानेही 103 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. आता भारतीय संघाला 162 धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे.
यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आणि विराट कोहली एक रन घेण्यासाठी धावले. यादरम्यान विंडीजचा खेळाडू केमार रोच यशस्वीच्या समोर आला. त्यामुळे संतापलेला यशस्वी रोचला शिवीगाळ करत असल्याचे स्टम्प माईकमध्ये ऐकू आले.
yashasvi jaiswal scolding kemar roach in hindi #YashasviJaiswal #ViratKohli𓃵 #INDvsWI pic.twitter.com/2dhX4VrliH
— Sayyad Nag Pasha (@nag_pasha) July 14, 2023
Yashasvi Jaiswal abusing 🥵 Westindies player in Hindi | LIVE REAL VIDEO |#india #westindies #indiavswestindies #indiavswestindieslivematch #yashasvijaiswal #jaiswal #cricket #cricketnews #viratkohli #rohitsharma #wqrcric7 #abuse pic.twitter.com/vrwEfbnTDl
— Wqr CRIC7 (@WqrCRIC7) July 14, 2023
हेही वाचा – Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-3’ मोहिमेतून आपल्याला काय मिळणार? जाणून घ्या!
सलग 9वी मालिका जिंकण्याकडे लक्ष
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेत एकूण 2 सामने खेळवले जाणार आहेत. फिरकी खेळपट्टी पाहता टीम इंडिया पहिल्या कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचली आहे. पहिल्या डावात ऑफस्पिनर आर अश्विनने 5 तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. हे दोन्ही गोलंदाज दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यांची नजर 9व्या विजयाकडे आहे.
ही मालिका भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन हंगामातील पहिली मालिका आहे. टीम इंडिया चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन मोसमात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली, पण पराभव पत्करावा लागला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!