WI vs IND 1st Test : विंडीजच्या ‘बड्या’ खेळाडूसमोर शुबमन गिलचा डान्स! पाहा Video

WhatsApp Group

Shubman Gill Dance : रवीचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने (WI vs IND 1st Test) दोन सामन्यांच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चहापानानंतर विंडीजला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळले.अश्विनने 24.3 षटकांत 60 धावांत पाच बळी घेतले, त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली, त्याने 14 षटकांत 26 धावांत 3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले आहे, त्यानंतर भारताने पहिल्या डावात आतापर्यंत 23 षटकांत 80 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल नाबाद 40 आणि रोहित शर्मा 30 धावांवर नाबाद आहे.

सामन्यादरम्यान शुबमन गिलने डान्स केला. जेव्हा वेस्ट इंडिजची बॅटिंग सुरू होती आणि रहकीम कॉर्नवॉल क्रीजवर उपस्थित होता, तेव्हा 63 षटकांच्या शेवटी शुबमन गिलची वेगळी शैली पाहायला मिळाली. 63 षटकांच्या शेवटी जेव्हा ब्रेक झाला तेव्हा गिलने क्रिझवर आपल्या स्टाइलमध्ये डान्स करायला सुरुवात केली, तर विराट कोहलीही गिलची स्टाइल पाहून मजा करताना दिसला. कोहली गिलचा डान्स पाहत होता आणि स्मितहास्य देत होता.

हेही वाचा – या महिन्यात स्वस्त मिळणार थार, बोलेरो, XUV 300! महिंद्राने आणली ऑफर

या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर भरभक्कम फलंदाज कॉर्नवॉल दोन्ही खेळाडूंच्या या धमाल शैलीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करताना दिसला. या सामन्यात अश्विनने कसोटी डावात 33व्यांदा पाच विकेट घेतल्या आणि यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय) 700 विकेट पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment