WI vs IND 1st Test : 700 इंटरनॅशनल विकेट्स, रवीचंद्रन अश्विनचा महारेकॉर्ड!

WhatsApp Group

Ravichandran Ashwin 700 International Wickets : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (WI vs IND 1st Test) रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. आता हरभजन सिंग आणि अनिल कुंबळेच्या खास क्लबमध्ये अश्विनने प्रवेश केला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात अश्विनने सर्वप्रथम टेगनारायन चंदरपॉलला आपला शिकार बनवले. यानंतर अश्विनने कर्णधार क्रेग ब्रेथवेटला बाद केले. त्याच वेळी त्याचा तिसरा बळी अल्झारी जोसेफ बनला. अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 477 विकेट्स आहेत. अश्विन त्याच्या कारकिर्दीतील हा 93वा कसोटी सामना खेळत आहे.

अनिल कुंबळेनंतर अश्विन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळी आणि 4000 धावा करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे पहिल्या स्थानावर आहे. त्याने भारतासाठी एकूण 956 विकेट्स घेतल्या आहेत. तर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग दुसऱ्या स्थानावर आहे. हरभजनने कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटसह एकूण 711 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : चंदरपॉलच्या पोराला बोल्ड करत अश्विनने रचला रेकॉर्ड! पाहा Video

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment