WI vs IND 1st Test : ‘फ्लाईंग’ मोहम्मद सिराजने घेतला अफलातून कॅच! पाहा Video

WhatsApp Group

WI vs IND 1st Test Mohammed Siraj Catch : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटीत वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण उपाहारापर्यंतच कॅरेबियन संघाची अव्वल फळी ढासळली. रवीचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजला सुरुवातीचा धक्का दिला. उपाहारापूर्वी रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेटही आली. यात जडेजाचा जेवढा वाटा होता, तेवढाच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचाही होता. मिडऑफवर तैनात असलेल्या सिराजने हवेत उडत एका हाताने आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल टिपताना सिराजच्या कोपरालाही दुखापत झाली, पण, त्याने चेंडू मुठीतून निसटू दिला नाही.

सिराजने हा झेल वेस्ट इंडिजच्या डावातील 28व्या षटकात घेतला. रवींद्र जडेजा हे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जर्मेन ब्लॅकवुडने मिड-ऑफवर एरियल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू पूर्णपणे त्याच्या बॅटवर आला नाही आणि हवेत मिड-ऑफच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षण करत सिराजने मागे उडी मारून एका हाताने झेल पकडला. सिराजचा हा शानदार झेल पाहून टीम इंडियाचे खेळाडूही खूश झाले. हा झेल पकडल्यानंतर सिराज काही वेळ जमिनीवर पडून होता.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : विराट कोहलीकडून डेब्यू कॅप, गळाभेट, मग पाठीवर शाबासकी!

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment