WI vs IND 1st Test : भारत-विंडीज पहिली टेस्ट मॅच फ्रीमध्ये पाहा, फक्त ‘या’ अॅपवर!

WhatsApp Group

WI vs IND 1st Test : भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​सायकलची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने करेल. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तेथे त्यांना दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ पहिल्या कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे. उभय संघांमध्ये 12 ते 16 जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे होणार आहे.

भारत 13 वर्षांनंतर डॉमिनिका येथे कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर शेवटचा सामना 2011 मध्ये अनिर्णित राहिला होता. टीम इंडियाला आतापर्यंत येथे फक्त एकच सामना खेळता आला आहे. त्यांची ही दुसरी कसोटी असेल. 2002 पासून भारताने वेस्ट इंडिजमध्ये एकही कसोटी गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा पराभव 2002 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने सहा कसोटी जिंकल्या असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : ‘ही’ जोडी भारतासाठी करणार ओपनिंग! आजपासून पहिली कसोटी

कधी, कुठे, कसा पाहायचा सामना?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलै दरम्यान होणार आहे. पहिली कसोटी IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. हा सामना डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रसारित केला जाईल. डीडी स्पोर्ट्स हा सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करेल.

हा सामना तुम्ही जिओ सिनेमा आणि फॅनकोड अॅप आणि वेब साइटवर ऑनलाइन पाहू शकता. जिओ सिनेमावर हा सामना फ्रीमध्ये पाहता येईल. तर फॅनकोडवर पाहण्यासाठी निश्चित किंमत मोजावी लागेल.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजचा संघ : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाज, टेगेनर चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, कर्क मॅकेन्झी, रॅमन रेफर, केमर रोच जोमेल वॅरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment