WI vs IND 1st Test : विराट कोहलीकडून डेब्यू कॅप, गळाभेट, मग पाठीवर शाबासकी!

WhatsApp Group

WI vs IND 1st Test : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वालने भारताकडून पदार्पण केले आहे. त्याच्याशिवाय इशान किशनलाही प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचीही ही पहिलीच कसोटीच आहे. एलिक अथानाझेनेही वेस्ट इंडिजकडून पदार्पण केले आहे.

भारताचा कप्तान रोहित शर्माने यशस्वी जयस्वालला डेब्यू कॅप दिली. तर विराट कोहलीने इशान किशनला डेब्यू कॅप दिली. कॅप देताना विराटने इशानची गळाभेट घेतली शिवाय त्याची पाठही थोपटली. बीसीसीआयने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नाणेफेकीनंतर रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला इथे येऊन खूप वेळ झाला आहे. आम्ही बार्बाडोसमध्ये सराव सामना खेळलो. डॉमिनिका येथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. पण आमची पूर्ण तयारी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी दोन वर्षांवर आहे. गेल्या दोन सत्रात आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आता काही नवे खेळाडू संघात आले आहेत. आम्हाला संघ म्हणून चांगले व्हायचे आहे. दोन्ही पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी या संधीचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. या दोन्ही खेळाडूंनी येथे येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी रिलॅक्स व्हावे आणि पहिली कसोटी आठवावी अशी माझी इच्छा आहे.”

हेही वाचा –  WI Vs IND 1st Test : वेस्ट इंडिजने जिंकला टॉस! भारताकडून ‘या’ दोघांचे पदार्पण

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment