WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा 4 धावा राखून पराभव केला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांच्या योगदानाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताला 150 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारताला 20 षटकात 9 बाद 145 धावाच करता आल्या. विडीजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताचा डाव
भारताचे सलामीवीर इशान किशन (6) आणि शुबमन गिल (3) या सामन्यात फलॉप ठरले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (21) आणि तिलक वर्मा (39) यांनी डाव सांभाळला. तिलकने 3 षटकारांसह आपले पदार्पण केले. जेसन होल्डरने सूर्यकुमारला हेटमायरकरवी झेलबाद केले. तिलकला रोमॅरियो शेफर्डने बाद केले. हार्दिक पांड्याही 19 धावा करून माघारी परतला. संजू सॅमसन (12) रनआऊट झाला. 113 धावांत भारताने 6 गडी गमावले. अक्षर पटेलही (13) मोठी खेळी करू शकला नाही. शेवटच्या षटकात भारताला 10 धावांची गरज होती. पण रोमॅरियो शेफर्डने या षटकात 5 धावा दिल्या. त्याने 2 बळी घेतले. जेसन होल्डर आणि ओबेद मॅक्कॉय यांनाही 2-2 विकेट घेता आल्या.
A narrow 4-run defeat for India in the first T20I despite Tilak Varma's impressive debut.#India #WIvsIND #Cricket #T20Is #HardikPandya #SanjuSamson pic.twitter.com/vk1G1QBBe5
— Wisden India (@WisdenIndia) August 3, 2023
हेही वाचा – WI Vs IND 1st T20 : कसला धावलाय भावा…! ‘डेब्युटंट’ तिलक वर्माचा अफलातून कॅच, पाहा
वेस्ट इंडिजचा डाव
विंडीजचा सलामीवीर ब्रँडन किंगने (28) संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. युझवेंद्र चहलने त्याच्यासह काइल मेयर्स (1) ला तंबूत पाठवले. त्यानंतर निकोलस पूरनने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 41 धावा जोडल्या. पूरननंतर कप्तान रोव्हमन पॉवेलची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. त्याने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 48 धावा केल्या. अर्शदीपने 19व्या षटकात 4 वाईड टाकले पण 2 विकेट्स नावावर केल्या. 20 षटकात वेस्ट 6 बाद 149 धावा फलकावर लावल्या.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!