WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर आजपासून (3 ऑगस्ट) टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वेस्ट इंडिजचे कर्णधार रोव्हमन पॉवेलकडे आहे. वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विंडीजने टॉस जिंकला असून भारत प्रथम गोलंदाजी करत आहे.
तिलक वर्मा आणि मुकेश कुमार भारताकडून पदार्पणाचा सामना खेळत आहेत. दोन्ही संघांच्या टी-20 रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 25 वेळा सामना खेळला गेला आहे. आणि टीम इंडिया वरचढ आहे. टीम इंडियाने 17 मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने 7 सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला आहे.
West Indies have won the toss and elect to bat first in the 1st T20I against India.
Live – https://t.co/AU7RtGPSOn… #WIvIND pic.twitter.com/CcXGYtzeA1
— BCCI (@BCCI) August 3, 2023
हेही वाचा – लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्यूटरच्या आयातीवर निर्बंध, मोदी सरकारचा मोठा निर्णय!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!