WI vs IND 1st T20 : टीम इंडियापुढे दीडशे धावांचे लक्ष्य; चहल, अर्शदीप चमकले!

WhatsApp Group

WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांच्या योगदानाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताला 150 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंना टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि फलंदाज तिलक वर्मा आज पहिला टी-20 सामना खेळत आहेत.

वेस्ट इंडिजचा डाव

विंडीजचा सलामीवीर ब्रँडन किंगने (28) संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. युझवेंद्र चहलने त्याच्यासह काइल मेयर्स (1) ला तंबूत पाठवले. त्यानंतर निकोलस पूरनने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 41 धावा जोडल्या. पूरननंतर कप्तान रोव्हमन पॉवेलची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. त्याने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 48 धावा केल्या. अर्शदीपने 19व्या षटकात 4 वाईड टाकले पण 2 विकेट्स नावावर केल्या. 20 षटकात वेस्ट 6 बाद 149 धावा फलकावर लावल्या.

हेही वाचा – WI Vs IND 1st T20 : कसला धावलाय भावा…! ‘डेब्युटंट’ तिलक वर्माचा अफलातून कॅच, पाहा

दोन्ही संघांची Playing 11

भारत – शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment