WI vs IND 1st ODI : वेस्ट इंडिजचा विक्रम, 114 धावांत ऑलआऊट, कुलदीपचा चौकार!

WhatsApp Group

WI vs IND 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी रचलेल्या फिरकीत वेस्ट इंडिजचे फलंदाज अडकले आणि त्यांना 114 धावाच करता आल्या. विंडीजचा संघ अवघ्या 23 षटकातच ऑलआऊट झाला. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हलवर आहे.

विंडीजकडून कप्तान शाय होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला इतर कुणाचीही साथ लाभली नाही. भारताकडून कुलदीप यादवने फक्त 6 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर जडेजाने 3 विकेट्स काढल्या. पदार्पणवीर मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – WI Vs IND 1st ODI : विराट कोहलीने घेतला सुपर कॅच, एका हाताची कमाल; पाहा Video

वनडेमध्ये वेस्ट इंडिजची भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या

  • 104 तिरुवनंतपुरम 2018
  • 114 ब्रिजटाउन 2023 *
  • 121 पोर्ट ऑफ स्पेन 1997
  • 123 कोलकाता 1993
  • 126 पर्थ 1991

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – शाय होप (विकेटकीपर/कप्तान), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, एलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment