Virat Kohli Takes Super Catch In Slip : भारत आणि वेस्ट इंडिज (WI vs IND 1st ODI) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळवला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी फिरकीच्या तालावर विंडीजच्या फलंदाजांना नाचवले. भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही चमक दाखवली. यात विराट कोहलीने घेतलेला झेल विशेष ठरला.
रवींद्र जडेजाने 18वे षटक टाकले. या षटकात त्याने दोन विकेट घेतल्या. चौथ्या चेंडूवर त्याने रोमॅरियो शेफर्डला स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडले. शेफर्डच्या बॅटची कड घेऊन सुसाट निघालेला चेंडू विराट कोहलीने एका हाताने टिपला. विराटने या कॅचमुळे सर्वांती वाहवा मिळवली.
What a catch by Virat Kohli.
– The GOAT in ODI.pic.twitter.com/ckq8PIpflS
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2023
हेही वाचा – रोहित, द्रविड आणि टीम मॅनेजमेंट संजू सॅमसनचं करियर संपवतायत?
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – शाय होप (विकेटकीपर/कप्तान), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, एलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!